मतदान झालं पण नाशकात कोण जिंकतंय, कोण हरतंय? | Rajabhau Waje vs Hemant Godse |

नाशिक लोकसभेसाठी आज मतदान पार पडलं. शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, अपक्ष उमेदवार म्हणून शान्तिगिरी महाराज अशा तिघांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली. भाजपचे सरकार असतानाही गोडसे यांना तिकीट देऊन एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतले की काय अशा चर्चा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी पाहायला मिळत होत्या . पण मतदानाच्या दिवशी नाशकात बराच काही वेगळं चित्र पाहायला मिळालं . नाशकात पाच वाजेपर्यंत एकूण 43 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात कोण जिंकणार,कोण होणार नाशिक चा खासदार ? त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. नमस्कार मित्रांनो, तरी नाशिक लोकसभेची चर्चा हेमंत गोडसे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ शांतिगिरी महाराज, राजाभाऊ वाजे या चार नावावर फिरत होती. उमेदवार जाहीर होण्यात होत असलेला विलंब पाहून छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली. गोडसे यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा जवळपास मतदारसंघात चालू होत्या. भुजबळ आणि गोडसे यांच्यात सुरु असलेल्या कोल्ड वॉर यामुळे वेगळ्या उमेदवाराचा पर्याय महाविकास आघाडी कडून विचारात घेतला जात होता. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पाच विद्यमान खासदारांची तिकीट आधीच कापल्यामुळं भाजपवर मतदारांची नाराजी ओढवून घेण्याचा धोका होता. शिवसेना ठाकरे गटाने मात्र पहिल्या यादीत राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करून धडाकेबाज सुरुवात केली होती. या सर्व गोंधळात शांतिगिरी महाराज स्वतः निवडणूक लढण्यावर ठाम होते. मात्र महायुती कडून तिकीट मिळालं तर उत्तम. अन्यथा अपक्ष लढण्याची तयारी केली होती.सरतेशेवटी या तिघांचे अर्ज दाखल झाले आणि त्यानंतर थेट लढत झाली. राजाभाऊ वाजे यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केलं. प्रचारासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी भेटला . शिवसैनिकांची मोट बांधत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना सोबत घेत वाजे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भर देत कांद्याची निर्यात बंदी, महागाई, बेरोजगारी या मुद्यांवर काम करण्यात अपयशी ठरलेल्या गोडसे यांच्यावर आणि केंद्र सरकारवर वाजे यांनी टीका केली. मधल्या काळात तर भुजबळ वाजे यांच काम करत आहेत. अशा बातम्या सोशल मीडियात फिरू लागल्या.

मतदारसंघातील मराठा आणि ओबीसी मतदान एकत्र करण्याच्या दृष्टीने वाजे यांनी सुरवातीपासूनच प्रयत्न केले. वाजे यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा घेतल्या. उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती मतदार संघात किंगमेकर ठरेल. गोडसे यांच्यासाठी नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांनी सभा घेतला. मागील दहा ते बारा दिवसात एकनाथ शिंदे यांनी जवळपास चार पाच दिवस हेमंत गोडसे यांच्या साठी दिले. शहरी भागातील मतदारांना आकर्षित करण्याकडे गोडसे यांचा कल राहिला. शिवाय तिकीट वाटपट नाव मागे पडलेल्या विजय करंजकर यांनी ऐन वेळी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना जिल्हा संपर्कप्रमुख यांची जबाबदारी देण्यात आली. शिवसेनेकडून तिकीट मिळण्याची आशा मात्र फेल ठरली. करंजकर यांच्या शिवसेनेतील समर्थक मात्र वाजे यांच्या विरोधात मतदान करतील, असा एकंदरीत चित्र आहे. पण करंजकर यांच्या जाण्याचा कुठलाच फरक पडणार नाही, असे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. अशी राहिलेली उमेद भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी याचा फटका शिवसेनेला बसणार, हे निश्चित आहे. शांतिगिरी महाराजांना नाशिकमधून चांगला पाठिंबा असला तरी ते निवडून येण्याची शक्यता कमीच आहे. भाजपच्या मतदारांना साद घालण्याचे काम अप्रत्यक्षपणे महाराजांनी केलं असून शहरातून आयोजित केलेला पदयात्रेच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकताना मोदी सरकारच्या कामाविषयी कौतुक करणं हे त्यांच्या बॅनर वर फुले वाहने असे काम महाराजांनी केल आहे . शांतिगिती महाराज या निवडणुकीत लाख ते सव्वा लाख मतं घेतील, असा प्राथमिक अंदाज आहे. कारण त्यांचा शिष्यवर्ग मोठा असून त्यांच्या संपर्काचा बराच फायदा होईल असे बोलले जाते. पण महाराज मतविभाजन करतील त्याचा फटका गोडसेना जास्त बसेल अशी शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत.

नाशिक लोकसभेचा एकंदरीत निर्णय घेतला असता या अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन तर भाजपचे तीन आमदार आहेत. 2019 पर्यंत युतीचा धर्म पाळणाऱ्या भाजपकडून गोडसे यांना तितकेच सहकार्य केलं जाण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय छगन भुजबळ यांच्या कुटुंबातील जागेला मागील दोन निवडणुकांत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या हेमंत गोडसे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार गटाचे आमदार, आणि नेते छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरूनच अपेक्षित उमेदवारा साठी काम करतील, असा अंदाज आहे. मतदानाच्या दिवशी दुपारपर्यंत नाशिकमधील हजारो मतदार सोशल मीडियावर माशाळीची हवा असल्याचे विडिओ पोट करत होते. एकंदरीतच आता नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांची सीट लाख ते दीड लाख मताने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे . पण महायुतीची ताकद मोठी असल्याने अंतर्गत पातळीवर हे समीकरण जुळले असल्याचे हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा नाशिकचे खासदार झाले तर नवल वाटायला नको. पण तुम्हाला नक्की काय वाटते? नाशिकमध्ये कोण खासदार होतील?तुमचं मत आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद.

Leave a Comment