मावळ लोकसभा जागेसाठी सोमवारी मतदान पार पडलं. मात्र त्या मतदानाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला नाही . खासकरून पुणे, शिरूर आणि मावळ भागात लोकांनी मतदान प्रक्रियेकडे पाठ
फिरवलेली दिसली. काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे लोकसभा मतदार संघात 44.90 टक्के शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये 43.89 टक्के, तर मावळ लोकसभा मतदार संघामध्ये फक्त 46.03 टक्के टक्के
मतदानाची नोंद झाली होती.
सकाळच्या सुमारास मावळ करांनी मतदानासाठी चांगलीच गर्दी केली होती. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. पण त्यानंतर दुपारी तो प्रतिसाद कमी झाला. पुढे सहा
वाजेपर्यंत मतदान संपता संपता लोकांनी उपस्थिती दाखवली. पावसामुळे जो व्यत्यय आला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अनेक केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होती. बोपखेल येथील मुळा नदीपासून ते मुंबईच्या समुद्र
किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघासाठी काल 52.30 टक्के मतदान झालं जे कि 2019 59 टक्के इतक झाला होत. म्हणजे एकूण सात टक्के मतदान घडलं. मावळ मतदारसंघात गेल्या तीन
विधानसभा मतदारसंघ हे पुणे जिल्ह्यातल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. पण शेवटच्या
काळात मावळमध्ये लोकांचा कल नेमका कोणाकडे पाहायला मिळाला. मावळमध्ये कोण जिंकणार, कोण करतय याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा .मंडळी मावळ लोकसभेत एकूण 25,85,018
मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 13,50,000 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 2,566 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी हजेरी लावली होती. मात्र फारसा जोर दिसला नाही. उन्हाची
तीव्रता कमी होत गेल्याने दुपारी चारनंतर नागरिकांची संख्या पुन्हा वाढली. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या. उन्हाची तीव्रता कमी झाल्याने मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले. लोक घोळक्याने
मतदान केंद्राबाहेर जाऊ लागली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने झाडे पडली आणि वीज खंडित झाली. त्यामुळे मतदान केंद्रांवरील मतदान दोन तीन तासांपेक्षा अधिक काळ थांबलं
होता. त्या भागात मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा किंवा फेरमतदान घ्यावे, अशी मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी राज्य आणि देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे केली आहे .
उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, सकाळपासून झालेले मतदान बघता जवळपास पंचावन्न टक्क्यांपर्यंत मतदान होईल, असा अंदाज आहे. मतदारांनी मोठ्या उत्साहात देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून
मतदान केलं. त्या मतदारांचे मनस्वी आभार व्यक्त करतो मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. कर्जत तालुक्यामध्ये वीज खंडित झाली. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील मागणी केली आहे. वीज अभावी ज्या मतदान केंद्रावर दोन तीन तास मतदान होऊ शकले नाही तिथे वेळ वाढवून देण्यात यावा
अन्यथा फेरमतदान घ्यावे. त्यामुळे काल मतदान केंद्रांवर लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सहापर्यंत केंद्रावर उपस्थित असलेल्या सर्व मतदारांना मतदान करून देण्यात आले. त्यामुळे अनेक केंद्रांवर रात्री
आठपर्यंत मतदान सुरू होतं.
मावळत्या निवडणुकीत भौगोलिक विविधतेला फार महत्व आहेच. पण यासोबतच सह्याद्री वरच्या दोन्ही बाजूला असणारा सांस्कृतिक विविधतेचा एक सुंदर मिलाफ या मतदारसंघात
पाहायला मिळतो. शहरी, निमशहरी, ग्रामीण तसेच आदिवासी भाग अशी वैविध्यपूर्ण रचना आहे. पावसाचे वैशिष्ट्य. लोहगड, विसापूर, राजमाची यांसारखे किल्ले, कार्ला, भाजे, लेण्यांना देव, एकविरा देवी यांसारखी
तीर्थस्थळे इत्यादी. अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वस्तूंचा सहवास लाभलेला हा मतदारसंघ. पर्यटकांसाठी तर प्रेक्षणीय आहेच, पण राजकारणाची आवड असणाऱ्यांसाठी मावळातील राजकारण नेहमीच चर्चेचा
विषय ठरतो. 2009 मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुंबई पुणे महामार्गाच्या दुतर्फा पसरलेल्या मावळ मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली मावळच्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला प्रभाव आहे. भाजपने
स्थानिक पातळीवरील अनेक बडे मासे गळाला लावून या भागात वर्चस्व मिळवले. तर रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा देखील प्रभाव दिसून येतो. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ तर रायगड
जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा मावळ लोकसभा मतदार संघात समावेश होतो. हे सहाही मतदारसंघ सध्या महायुतीच्या ताब्यात आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या
दोन गटात त्या ठिकाणी सामना रंगणार असून शिवसेना गटातर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तर ठाकरे गटातर्फे संजोग वाघेरे यांना त्यावेळी संधी देण्यात आली आहे. तगडा जनसंपर्क व शिवसेनेत दीर्घकाळ
केलेलं काम मतदार संघात सक्रिय असलेला महायुती फॅक्टर या बारणे जमेच्या बाजू आहेत. तर पिंपरी चिंचवडचे पाच वर्ष शहराध्यक्षपद. शिवसेना ठाकरे गटाशी असलेली सहानुभूती आणि शिवसैनिकांमध्ये
असलेला सकारात्मक वातावरण या संजोग वाघेरे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. पुण्याचा काही टापू रायगडमधील काही भाग असा मावळ लोकसभेचा मोठा विस्तार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस नेते
अजित पवार यांची समसमान ताकद असलेल्या या भागातील लढत रंगतदार होईल, असे राजकीय जाणकार सांगतात. दरम्यान, सुनील शेळके विरुद्ध बाळा भेगडे या वादामुळे मावळ मधील लढतीला आणखी रंगत
चढली. सध्या दोघेही महायुतीचे भाग असले तरी सामंजस्याने एकमेकांसोबत काम करावं अशी परिस्थिती दोघांमध्ये बिलकूल दिसली नाही. पण त्याच परिस्थितीचा फायदा झाला. विकास आघाडीचे उमेदवार
संजोग वाघेरे यांना होऊ शकतं, असंही बोललं जात आहे. मंडळी मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवडमधील पिंपरी चिंचवड आणि मावळ या तीन तर रायगडमधील कर्जत, पनवेल आणि उरण या तीन
विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या भागात मागील पंधरा वर्षांत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. गजानन बाबर आणि नंतर श्रीरंग बारणे या दोघांनी आपल्या खासदारकीचा प्रतिनिधत्व केला. दरम्यान,
पिंपरी चिंचवड हा भाग दिर्घकाळ अजित पवारांच्या प्रभावाखाली असलेला भाग म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या ठिकाणी अजित पवारांना आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला आपला खासदार निवडून
आणता आला नाही. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी 2019 लोकसभा निवडणूक लढवली खरी. परंतु त्यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी निसटता पराभव झाला. हा पराभव अजित पवारांना चांगलाच जिव्हारी
लागला होता. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे ही लढत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी न होता. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच होणार आहे. माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी काही दिवसांपूर्वी माझ्यासमोर उमेदवार कोण आहे हे मला माहित नाही असं विधान केलं होतं. संजोग वाघेरे यांना हलक्यात घेण्याच काम बारणे करत होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बारणे साठी चार तास रोड शो घ्यावा लागला. उपमुख्यमंत्री,पंतप्रधान यांना देखील होऊ लागलं यावरून बारणे यांना समोरील उमेदवार कोण आहे हे नक्कीच कमी झालं असेल, असा खोचक टोला संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांना लगावला होता. या मतदारसंघात महायुतीच्या सर्वच घटकांनी व्यवस्थित काम केलं. तर श्रीरंग बारणे यांचा विजय सोपा होईल, असा कागदोपत्री स्पष्ट दिसत होता.
पनवेल आणि चिंचवड मध्ये भाजप मावळ आणि पिंपरीमध्ये अजित पवार गट तर कर्जतमध्ये शिवसेना शिवसेना गटाचे आमदार असल्याने एकूण पाच आमदारांच्या ताकतीचा फायदा बारणे यांना नक्कीच होऊ शकतो. मात्र कागदावर असलेली परिस्थिती ही वस्तुस्थिती नाही. ही गोष्टही खरीच आहे. लोकसभेच्या निमित्तानं विधानसभेची तयारी करू इच्छिणाऱ्या अनेक बिन्न पक्षांतील उमेदवारांमध्ये आलबेल परिस्थिती नाही. कर्जतमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले महेंद्र थोरवे हे शिंदेच्या शिवसेनेत आहेत. तर सुरेश लाड हे गेल्या वर्षी भाजपवासी झाले आहेत. तीच परिस्थिती मावळची होती. एकमेकांची उणीदुणी काढणारे सुनील शेळके हे राष्ट्रवादीचे अजित पवार तर बाळा भेगडे हे भाजपासोबत आहेत. अशा परिस्थितीत महायुती म्हणून एकत्र काम करण्याच्या मर्यादा दोघांनाही येत बारणे यांना तिकीट देऊ नका असे सांगण्यात तरी या दोघांचे एकमत होतं. बारणे यांना भाजपच्या तिकीटावर लढवण्यास देवेद्र फडणवीस इच्छुक होते. मात्र जनतेत चुकीचा संदेश जाईल म्हणून महायुतीने आपला निर्णय बदलला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, गट श्रीरंग बारणे यांचे काम करणार का? हा खरा सवाल आहे. पार्थ पवार यांच्या पराभवाचा बदला घेण्याची इर्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आणि अजित पवारांना स्पष्टपणे आम्ही बारणे यांच काम करणार नाही, असं सांगितलं आहे. त्याऐवजी पक्षातील पूर्वीचे सहकारी असलेल्या संजोग वाघेरे यांचे काम करू, असे कार्यकर्ते अजित पवार यांना सांगत आहेत. पिंपरी चिंचवड भागात अशा प्रकारे चित्र हल्ली तर बारणे अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची बर्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी भाजपमधील एक गट सुद्धा बारणे यांच्या विरोधात काम करत असल्याच्या चर्चा लोकांमध्ये आहेत. दोनच दिवसांपूर्वी कामशेत येथे झालेल्या सभेत सुनील शेळके यांनी भाजपचे लोक दुचाकी, दिवस धनुष्यबाण आणि रात्री माशालीच काम करत असल्याची अप्रत्यक्ष टीका बाळा भेगडे यांच्यावर केली होती. याला प्रत्युत्तर देताना सुरुंग विरोधकांना लावायचाय महायुतीला नाही याची काळजी घेतली पाहिजे. विरोधात असलेला माणूस आपलाच आहे म्हणून त्याचं काम करायचं असेल तर तिकडेच राहा, असा टोलाही बाळा भेगडे यांनी सुनील शेळके यांना लगावला आहे. या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मागील पाच वर्षात अनेकदा हाणामारी झाल्याचं पाहायला मिळाले. शेळके भेगडे वादासहित मतदार संघात श्रीरंग बारणे यांच्या विरोधातील अंतिम कामगिरी उद्धव ठाकरेंची अडचणीच्या वेळीच सोडली सात . या घटनांचा फायदा संजोग वाघेरे यांना होऊ शकतो, असं राजकीय जाणकारांचे मत आहे. मतदानाच्या दिवशी काही मतदारांचा रोख तसा दिसून आल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात. पण तुम्हाला नेमक काय वाटते? मावळ लोकसभेच्या जागेवर संजोग वाघेरे बाजी मारतील की श्रीरंग बारणे त्यांचा गड कायम राखण्यात यशस्वी ठरतील. तुमच्या मत आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.