भाजपसाठी Eknath Shinde, Ajit Pawar यांचा उपयोग संपलाय का ?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा टप्पा सोमवारी पूर्ण झाला. पाच टप्प्यात एकूण 48 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असा आत्तापर्यंत समजला जायचा. या निवडणुकीतील एकूण रणधुमाळी लक्षात घेता केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेश सोबतच महाराष्ट्रातूनही जातो, असा ठामपणे म्हणण्याची वेळ आली आहे. केंद्रात पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर महाराष्ट्रात गत निवडणुकीत मिळालेल्या 41 जागा तरी राखता यायला हव्यात. पाच सात इकडे तिकडे समजून घेऊ. पण महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वीस पंचवीस टक्के कमी होणं हे भाजपाच्या केंद्रातील सत्तेला डळमळीत करणार आहे, याची पुरती जाणीव. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना होती. मागील चार वर्षांपासून लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे प्रयोग राज्यात केले गेले. त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट या प्रयोगांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. राज्यातील सत्तेच्या चाव्या आणि पक्षांचा ताबा स्वतःकडे ठेवण्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना यश मिळालं होतं. पण लोकसभेच्या मैदानात भाजपला अपेक्षित निकाल मिळाला नाही तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच नेमका काय होणार हा प्रश्न आता सामान्य जनतेला पडू लागला आहे, एवढे मात्र नक्की. याविषयीच्या शक्यतांचा आढावा घेणारा हा संपूर्ण माहितीपट . लोकसभा निकालाच्या एकूण तीन शक्यता विचारात घेऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा नेमका काय होईल? आपण पाहूयात. लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत महायुतीला पस्तीस पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर येत्या सहा महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात हवं ते मिळेल. जागा जिंकण्यात यश मिळाल्याने केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी सत्तेत येतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरातील आपल्या आमदारांना ताकद देतील. त्यांचा मुख्यमंत्रिपद कायम राहील. अजित पवारांनी प्रचारात कबूल केलेल्या गोष्टी धडाधड मंजूर केल्या जातील. राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधीचा वाटप होईल. या शिवाय जर बारामतीच्या जागेवर सुनेत्रा पवार निवडून आल्या तर त्यांना केंद्रात एखादा चांगला मंत्रिपद मिळेल किंवा अजितदादांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल. शरद पवारांना नामोहरण करण्याची आणि बॅकफुट वर ढकलण्याची आयतीच संधी अजितदादाना मिळेल . दुसरी शक्यता आहे महाविकास आघाडी आणि महायुतीला समसमान जागा मिळाल्या तर राज्यातील लोकसभेच्या जागांच गणित जवळपास 25 ते 28 दरम्यान राहील. तर भाजपला अधिक सावधानतेने पावले उचलेल. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची किती ताकद आहे, याचा अंदाज भाजपला आलेला असेल.

विधानसभा मतदारसंघनिहाय कुठल्या पक्षाला किती मतदान घेतलं याची आकडेवारी काढली जाईल. ज्या पक्षाचा अथवा उमेदवाराचा बिलकुल प्रभाव पडलेला असेल त्याला दच्चू दिला जाईल. याच आकडेवारीच्या आधारावर विधानसभेच्या जागा वाटपाचा कार्यक्रम ठरवला जाईल. ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून आलेले असतील त्यांची त्यांची बर्गेनिंग पॉवर सुद्धा वाढलेली असेल तर या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर वरचढ ठरलेले पाहायला मिळेल. राज्य मंत्रिमंडळातील महत्वाचे निर्णय फडणवीसांच्या पुढाकाराने होतील. अजित दादांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागेल. केंद्रातील बहुमतासाठी जुळवाजुळव करावी लागल्याने मित्रपक्षांना कायम सन्मानाची पदे या काळात दिली जातील. तिसरी शक्यता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असेल. महाविकास आघाडीने राज्यात तीस पस्तीस पेक्षा अधिक जागा जिंकल्या तर भाजपकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना घरचा रस्ता दाखवला जाईल. ज्या कारणासाठी पक्ष फोडीचा खटाटोप केला तो सपशेल फेल गेल्याचा शल्य भाजपच्या नेतृत्वाच्या मनात राहील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेल्या सहानुभूतीची लाट विधानसभा निवडणुकीत कायम राहिली तर आपलं काही खरे नाही या विचाराने शिंदे आणि पवारांना बाजूला सारून स्वतंत्र लढण्याचा विचार भाजपतर्फे केला जाईल. केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आलं तर डबल ट्रिपल इंजिन सरकारच्या घोषणा शिंदे फडणवीस पवार करत होते. ते बंद होतील. राष्ट्रवादीच अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना गटातील विद्यमान आमदार आपल्या आमदारकी वाचवण्यासाठी आटापिटा करू लागतील. या आमदारांसाठी परतीचे दोर कापले आहेत , असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आधीच सांगितलं असल्यानं नाघर का ना घाटका अशी त्यांची अवस्था होईल. एकुणातच काय आपल्या आमदारकी वाचविण्याच्या पलिकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना विशेष करण्यासारखं काही राहणार नाही. कदाचित इंडिया आघाडी मार्फत याच नेत्यांच्या बंद केलेल्या क्लिन चिट दिलेल्या फाईल्स पुन्हा ओपन केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच निवडणूक महाराष्ट्रातील भाजपच्या पाच वर्षांतील राजकीय उलथापालथीचा निकाल देणार असेल. लोकशाहीत मतदार हाच राजा असतो, असं म्हटलं जातं. हा मतदार राजा कुणाच्या डोक्यात मुकुट घालतो आणि कुणाला पायदळी तुडवतो याचा निकाल 4 जुनला समजेल. तुम्हाला काय वाटते? राज्यात महाविकास आघाडी च्या अधिक जागा निवडून आल्या तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना युतीतून बेदखल केलं जाईल का? भाजपला स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोडावे लागेल का? तुमचं मत आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. 

Leave a Comment