मंडळी तुमचे आमच्या जीवनाची सुरक्षितता आजकाल खूप महत्वाची झाली. कुणाचा कधी काय होईल ते आपण सांगू शकत नाही त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी बंदूक किंवा रिव्हॉल्वर ठेवायची इच्छा असते. पण खूप लोकांना बंदुकीचे लायसन्स कसे काढायचे हेच माहीत नसते. तसं बंदुक कोणी पण घेऊ शकतो म्हणजे अगदी तुम्ही आम्ही सुद्धा आता तुम्ही म्हणाला आपण तर रिटायर्ड पोलीस किंवा आर्मी आॅफिसर तर नाही मग आपल्याला कसे मिळू शकते तर थांबा या मेसेज मध्ये तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊन आले.
नमस्कार तर मंडळी भारत सरकारच्या कायद्यानुसार भारताचा कोणताही नागरिक बंदूक विकत घेऊ शकतो. पण त्यासाठी प्रशासनाने काही नियम आणि प्रक्रिया बनवले. यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. पण अर्ज करणे हे मात्र तुम्हाला अनिवार्य असेल तर तुम्ही तुमचा अर्ज जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयात देऊ शकता. त्यानंतर तुमच्या अर्जाची व्यवस्थित पडताळणी करूनच तुम्हाला लायसन्स मिळतं, पण त्यात तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःच्या संरक्षणासाठी वापरू शकता. त्याचा वापर सार्वजनिक ठिकाणी शिकारीसाठी आणि कोणाला धमकावण्यासाठी करू शकत नाही.
कोणताच परवाना देण्याचा अधिकार त्या त्या राज्याच्या गृह मंत्रालय आणि जिल्हाधिकाऱ्याचा नसतो आणि त्यासाठी ते संबंधित माणसाची सर्व माहिती समजून घेतात. त्याची शहानिशा करतात आणि मग जर त्यातून त्यांचा विश्वास पटला तरच बंदुकीचा परवाना ते मंजूर करतात. आता ही झाली तुम्हाला बंदुकीचा परवाना कसा मिळतो या संदर्भातली माहिती पण यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची यादी लागते.
- कागदपत्रांची यादी |
त्यामुळे यात सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही कोणत्यातरी शूटिंग केंद्रातून पूर्ण बंदूक चालवण्याचा ऑफिशियल ट्रेनिंग घेतलेला असेल व त्यासाठी तुम्ही मेडिकल फिट असल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावे लागते. त्यानंतर तुम्हाला रहिवासी दाखला,त्याचबरोबर तुमचे ओळखपत्र जन्मदाखला कलेक्टर सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला तुमच्या मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे तुम्ही काय काम करता? तुमचा व्यवसाय काय किंवा नोकरी करता याची कागदपत्रे आणि त्याबरोबर तुम्हाला कोणत्या प्रकाराच हत्यार घ्यायच आहे? यासंदर्भात माहिती गोळा करावी लागतो.
जेव्हा तुम्ही जिल्हा दंडाधिकारी तळाला जाता तुम्हाला एक अर्ज दिला जातो तो अर्ज भरताना तुम्हाला बंदूक कोणत्या कारणासाठी कोणत्या कारणासाठी हवी आहे हे लिहावे लागततो. हे सगळे झाल्या नंतर तुमचा फॉर्म जिल्हा पोलीस मुख्यालया जातो आणि तिथून तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तिथे तुमचा पत्ता तुमचे अजून काही क्राईम रेकॉर्ड आहे का हे पडताळला जातो. हे सगळं झाल्यावर अखेर तुमची फाइल पुन्हा एकदा पोलीस मुख्यालय तिथे पुन्हा एकदा पोलिसांची एक इंटेलिजेंस टीम तुमच्या सगळ्यांची माहिती करतो. शेवटी मूळ कलेक्टरांच्याकडे जातो. आणि त्याच्या मर्जीने अखेरची पर्वणी मिळते.कधी त्या ठिकाणी सुद्धा फक्त जिल्हाधिकार् यांची मर्जी नाही म्हणून सुद्धा तुमचे लायसन्स रद्द होऊ शकते.त्याचा असं की तुमच्या बंदुकीच्या परवान्याचा अंतिम निर्णय हा सर्वस्वी जिल्हाधिकाऱयांचा असतो.
एकदा का त्यांची परवानगी मिळाली की सरकारी दुकानातुन तुम्हाला बंदूक खरेदी करावी लागते व घेतल्यानंतर आपल्याला ती बंदूक प्रशासनाला दाखवावी लागते. पुन्हा एकदा त्याची सर्व माहिती प्रशासन आपल्याकडून करून घेतो. तुमचा स्थानिक पोलीस स्टेशन सुद्धा या बाबतीत सगळ्या माहितीची नोंद ठेवते. आणि मग या सगळ्या मोठ्या प्रोसेसनंतर तुम्हाला बंदूक आणि लायसन्स घरी घेऊन जाता येतं. आता ही झाली बंदुक मिळवण्याची प्रोसेस मग गोळ्याच काय तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला बंदुकीसोबतच अर्ज करावा लागतो.
- एक व्यक्ती एका वेळी किती गोळ्या खरेदी करू शकतो.
एक व्यक्ती एका वेळी 100 गोळ्या खरेदी करू शकतो आणि त्याला एका वर्षाला 200 गोळ्या खरेदी करण्याच लिमिट असतं. प्रत्येक राज्यानुसार हा नियम बदलत राहतो. हा पण तुम्ही विकत घेतलेल्या गोळ्या कुठे आणि कशा फायर झाल्या याची सर्व माहिती तुम्हाला प्रशासनाला द्यावी लागते तरच नवीन विकत घेता येतात. आता तुम्ही म्हणाल. या सगळ्या प्रोसेसला नेमका किती वेळ जातो त्यामुळे सांगू शकत नाही. कारण काही लोकांना एका महिन्यात तर काही लोकांना तब्बल एका वर्ष लागली बंदुकीच लायसन्स मिळवण्यासाठी साठी . आता बंदूक तर मिळाली पण त्याची वैधता किती आहे हे ही जाणून घेऊ. आधी त्यासाठी तीन वर्षांचा काळ मंजूर केला जायचा. पण नंतर त्यात बदल करून आता तो पाच वर्षा केला आहेआणि ही वेळी सुद्धा प्रत्येक राज्यानुसार बदलत राहते. जर या काळा नंतर ही जर तुम्हाला बंदूक वापरायची असेल तर ते लाईसन्स तुम्हाला रिन्यू करून घ्यावे लागते. सांगायचं झालं तर 2019 च्या कायद्यानुसार एका व्यक्तीला फक्त दोनच हत्यारच लाईसन्स मिळत.
- किती पैसे मोजावे लागतात?
आता येतो सगळ्यात मेन मुद्यावर या सर्व प्रोसेस साठी अर्जदाराला किती पैसे मोजावे लागतात? खरंतर राज्यानुसार लायसन्स काढण्याचा फी सुद्धा वेगवेगळी आहे वेग वेगळ्या बंदुकीच्या प्रकारानुसार साधारण 1000 ते 5000 इतकी लायसन्स काढण्यासाठी अर्ज फी घेतली जाते. त्यानंतर जेव्हा तुम्हाला बंदूक मिळते तेव्हा तुम्ही बंदूक तुमच्या जिल्ह्याच्या बाहेर घेऊन जाऊ शकत नाही असा नियम असतो. तुम्हाला जर संपूर्ण देशभर तुमची बंदूक वापरायची असेल तर त्यासाठी तुम्हाला स्पेशल परवण्याचं गरज असते . त्यालाचा natinal arms licence असे ही म्हणतात.सध्या हा परवाना फक्त रिटायर आर्मी ऑफिसर,अधिकारी, खेळाडू, यांना असतात. त्याचबरोबर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम दहीहंडी, नवरात्र, दिवाळीत तुम्हाला तुमची बंधू पोलीस स्टेशनला जमा करावी लागते. पुढे जर बंदुकीचा गैरवापर केला तर त्याला 2 वर्ष जेल होऊ शकते. त्याचा हत्यार बाळगण्याच लाईसन्स सुद्धा रद्द होऊ शकत आणि त्याचबरोबर तुम्हाला 2,00,000 रुपयांचा अतिरिक्त दंड देखील भरावा लागतो. आता मग तुम्ही म्हणाल आपल्याला बंदुकीचे लायसन्स मिळते तर मग आपण ak47 खरेदी करू शकतो का तर त्याच उत्तर आहे नाही ? चे दोन प्रकार असतात. एक म्हणजे npb आणि दुसरं म्हणजे pb म्हणजे नॉन प्रोहिबिटेड बोर्ड आणि ते म्हणजे प्रोहिबिटेड बोर्ड . आता आपल्याला ज्या पद्धतीचा परवाना मिळतो त्या नॉन प्रोहिबिटेड मिळतात आणि ak47 मशीन गनसारख्या ऑटोमेटेड आणि सेमी ऑटोमॅटेड मध्ये मोडतात या वापरायला आपल्याला परवानगी नाही. त्या फक्त डिफेन्स मध्ये वापरल्या जातात. आता समजा लाईसन्स वाला माणूस मयत झाला तर त्याचं काय करायचं तर त्याची बंदूक आणि त्याचं लाइसेन्स प्रशासन आपल्याकडे जमा करून घेत . आत्ताच्या आकडेवारी नुसार भारतात जवळपास 35,00,000 बंदुकीचे परवाने आणि सर्वात जास्त परवाने एकट्या उत्तर प्रदेशमध्ये जवळ आहे.बंदुकीचे परवाने त्यापाठोपाठ जम्मू, काश्मीर आणि पंजाब चा नंबर लागतो. भारतात बंदूक परवानासाठी एवढी प्रोसेस असली तरी अमेरिकेमध्ये बंदूक बघायला आणि विक्रीला मात्र कोणताच परवाना लागत नाही. कारण प्रत्येक देशात हत्यार बाळगण्या संदर्भातले कायदे वेगवेगळे आहेत. तर मंडळी अशी आहे बंदूक परवानासंदर्भातली सगळी माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली? मला कळवा अजून अशाच प्रकारची माहितीपूर्ण ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या पेज सोबत जॉईन व्हा.
धन्यवाद!