तुम्हाला सध्या त्यांचा तसा पाण्यावर तरंगत ज्ञानेश्वरीतले श्लोक म्हणताना एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत असेल ते प्रकरण असं कीं बाबांच्या गावातले लोक त्याला चमत्कार म्हणतायेत बाबांवर देवाची कृपा झाली असेही त्यांचं म्हणणं आहे पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता बाबांना चॅलेंज देऊन त्यांचा चमत्कार खोडून काढण्यासाठी कंबर कसली त्यामुळे आता प्रश्न निर्माण झालाय की खरंच बाबांनी जी कला साध्य केली त्याला चमत्कार म्हणायचं का बाबांच्या पाण्यावर तरंगण्यामागे नेमकं काही सायन्स आहे का सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी चुलीवरच्या गरम तव्यावर बसून सिगारेट फुकणार एका बाबाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा काही लोकांनी त्या बाबांना सपोर्ट दर्शवला होता तर काही लोकांनी त्यांच्यावर चढवून टीका केली होती.
हे असे महाराज हिंदू धर्माला कलंक आहेत अशी काही सुज्ञ नागरिकांनी प्रतिक्रिया ही दिली होती ते प्रकरण थांबत नाही तोच आता या पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांचा व्हिडिओ समोर आलाय हिंगोली जिल्ह्यातील धोतरा येथे भागवत सप्ताह सुरू आहे तिथे भागवत सांगणारा हरिभाऊ महाराजांनी मी पाण्यावर कोणताही आधार न घेता राहू शकतो असा दावा केला होता त्याबद्दल पत्रकारांनी थेट बाबांना विचारलं तर त्यांनी आध्यात्मिक गोष्टींचा दाखला दिला मी हे सगळं खूप अभ्यासाने साध्य केले आहे यात कोणताही चमत्कार नाही माझ्या वडिलांपासून ही कला मी शिकलोय 14 महिन्यांचा उपवास आणि देवाचं नामस्मरण केलं तेव्हा हे शक्य झाले माझ्यासारखं कुणीही ती विद्या शिकू शकतो माझ्या घरात आम्ही सगळे त्याचाच सराव करतो त्यात माझ्या इतर शिष्यांनी ही कला उगत केली स्वतः बाबा त्यांच्या कलेला चमत्कार म्हणत नसले तरी मात्र त्यांच्या पंचक्रोशीतले लोक त्यांना दिव्य पुरुष समजून त्यांच्या दर्शनाला येतात त्यामुळे आता त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नजर पडली नसती तर नवलच त्यानंतर भागातील अनिशा कार्यकर्त्यांनी आता मी बाबांसमोर जाऊन ते जे करताय ते करून दाखवणार आहोत पण आता प्रश्न हा पडतो की बाबा जे करता येतो खरंच चमत्कार आहे की त्यामध्ये काही रॉकेट सायन्स घडले.
पुणे जिल्ह्यातील चाकणचे योगा शिक्षक बापूसाहेब सोनवणे यांनी त्याबद्दल आपलं मत मांडलं त्यांच्या म्हणण्यानुसार बाबाजी करतात तो चमत्कार नसून योगाचा प्रकार आहे त्याला क्लॉविटी प्राणायाम असे म्हणतात तो फ्लावर हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ पोहणे असा होतो पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत अगदी तसंच माणूस देखील पाण्यावर तरंगू शकतो जो मनुष्य तो प्राणायाम नियमित करतो तो आपल्या शरीर इतका हलकं बनवू शकतो की त्याचा शरीरही कमळाप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात श्वासोच्छवासाचा व्यायाम करून तो प्राणायाम साध्य करता येऊ शकतो आणि योगाचे अभ्यासक चंद्रशेखर सर यांनी सांगितलं की आपण जमिनीवर बसून जे मत्स्यासन करतो तेच पाण्यात केलं किंवा अगदी पाण्यात शरीर सरळ करून आपण मंद श्वास घेत गेलो तरीही आपण पाण्यावर तरंगू शकतो मेडिटेशन साठीची ही सर्वोत्तम अवस्था आहे ही देवी गोष्ट नसून त्याला योग शास्त्राचा आधार आहे तर अगदीच आपण आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात श्वास घेतला आणि एका ठराविक स्थितीमध्ये बसलो तेव्हा आपल्या शरीरात हवा जास्त भरल्याने आपण सहज पणे पाण्यावर तरंगू शकतो.
सांगायचं म्हटलं तर पाण्यावर जिवंत शरीर बुडतं आणि मृत शरीर तरंगते कशामुळे तर माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कार्य करणे थांबवते शरीर विघटित होऊ लागतं मृत शरीरातील जिवाणू पेशी आणि उती नष्ट करण्यास सुरुवात करतात जिवाणूमुळे शरीरात मिथेन अमोनिया कार्बन डायऑक्साइड हायड्रोजन इत्यादी वेगवेगळ्या संबंधित क्रिया मुळे व्यक्तीचा शरीर फुगू लागतं फुगल्यामुळे शरीराचा आकारमान वाढत शरीराची घनता कमी होते आणि त्यामुळे कोणत्याही मृत व्यक्तीचा शरीर पाण्यावर तरंगतात हे तर काहीच नाही तुम्हाला जिवंतपणे पाण्यावर तरंगायचं असेल तर इजराइल व जॉर्डन दरम्यान पसरलेल्या डेड सी म्हणजेच मृत समुद्रात तुम्ही जाऊ शकता कारण त्या समुद्रात कोणतीच गोष्ट बुडत नाही आता जाता जाता शेवटी तुम्हाला वस्तू नेमक्या पाण्यावर का तरंगतात त्याचा बेसिक नियम सांगतो जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा अधिक असेल तर ती पाण्यात बुडते मात्र जर वस्तूची घनता ही द्रवाच्या घनतेपेक्षा कमी असेल तर ती पाण्यावर तरंगते बाकी लॉजिकला फाटा देणाऱ्या गोष्टी उडत उडत तुमच्या कानावर येतीलच तुम्ही मात्र विज्ञानाची कास सोडू नका त्या प्रकरणाबद्दल तुमची जी काही मत असतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.