चऱ्होली बैलगाडा शर्यतितील वाद अखेर महेश दादांच्या पुढाकारणे मिटला !

 

चऱ्होली  बैलगाडा  शर्यतितील  वाद  अखेर मिटला !

बैलगाडा शर्यत चालू व्हावी व अविरतपणे चालू रहावी या साठी आमदार महेश दादा लांडगे साहेब यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन बैलगाडा मालकांना मदत केली आहे.. शर्यतीतील किरकोळ वाद सामंजस्याने मिटवल्याबद्दल दादांचे मनःपूर्वक आभार. ….

खर तर जेथे स्पर्धा असते तेथे चुरस असते, त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असोत किंवा कबड्डी, क्रिकेट किंवा बैलगाडा शर्यत असो….अंतिम सामन्याचे वेळी निकालावरून आक्षेप, वाद, स्पर्धा उधळून लावणे इत्यादी गैरप्रकार होणे नेहमीचेच झाले आहे…. बैलगाडा शर्यती मध्ये सुद्धा हे आता नवीन राहिलेले नाही…. मोठी बक्षीसं आणि मोठ्या किमतीच्या बैलांचा समावेश शर्यती मध्ये झाल्यामुळे अंतिम निकालावेळी हातघाई वर येण्याचे प्रकार होत आहेत….या मध्ये कधी आयोजक, घड्याळ चालक, निशाण चालक, बैलगाडा मालक तर कधी हुल्लडबाजी करणाऱ्या प्रेक्षकांना दोष दिला जातो…..स्थळ काळ वेळ बदलून हे हल्ली खूप ठिकाणी होताना दिसत आहे.

खर तर बैलगाडा शर्यती मध्ये बैल धावत असले तरी ही शर्यत मानव निर्मित आहे व मानवी नियंत्रणाखाली चालते, निकाल प्रक्रियेमध्ये पाहिजे तेवढा आधुनिक साधनांचा वापर होत नसल्याने अंतिम निकाल तंतोतंत अचूक देणे शक्य होत नाही.. बैलगाडा शर्यतीतील निकाल घड्याळ चालक व झेंडा (निशाण) पंच या दोघांच्या समन्वयाने देण्याचा प्रयत्न केला जातो… दोघांनाही त्यासाठी खूप दक्ष रहावे लागते . तसेच कमी सेकंद मध्ये शर्यत पूर्ण करण्यासाठी बैलांची जुंपणी, पळणी, प्रेक्षकांचा प्रतिसाद, अनाऊसर चा आवाज तसेच धावपट्टी च्या अंतिम टोकाजवळ असणाऱ्या झेंडा (निशाण ) पंच समोर असणारी अनावश्यक गर्दी यागोष्टींचा सुद्धा परिणाम होत असतो.. अनेक वेळा फायनल चे वेळी अतिउत्साहात प्रेक्षक धावपट्टी वर आल्यामुळे, बैलांना पळण्यासाठी आवश्यक जागा मिळत नाही व शर्यती मध्ये अडथळा निर्माण होतो…. अर्थातच या सर्व घटकांचा अंतिम निकालावर परिणाम दिसून येतो…तसेच फायनल च्या वेळी एका सेकंदाचे 10 भाग एवढ्या सूक्ष्म स्तरावर हा निकाल डिस्प्ले वर दिसत असतो….खरतर एवढ्या सूक्ष्म स्तरावर 500 फूट अंतरावर उभ्या असलेल्या 2 पंचांना तारतम्य बुद्धी चा वापर करून हा निकाल द्यावा लागतो…तो एक चांगला निकाल देण्याचा अंदाजित प्रयत्न असतो असेच म्हणावे लागेल.. थोडक्यात एकाच स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांचे, निकालाबाबत 100% समाधान करणारी यंत्रणा कोठेच उपलब्ध नसल्याने निकाल प्रक्रियेबाबत समज गैरसमज, वाद विवाद, सध्या निर्माण होत आहेत .. वाढत्या स्पर्धेमुळे व शर्यती अत्यंत चुरशीच्या होऊ लागल्याने भविष्यात संभाव्य वाद टाळायचे असतील तर शर्यतीच्या निकाला साठी अत्याधुनिक साधनाचा वापर करणे हे सोयीचे व हिताचे ठरणार आहे,

अनेक वर्षाच्या बंदी नंतर शर्यत चालू झाल्याने व शर्यत बंदी च्या लढ्याची देश भर चर्चा झाल्याने शर्यतीचे आकर्षण हल्ली वाढले आहे, या मध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे.. जुन्या काळात गाव जत्रेतील स्पर्धेत काही अलिखित नियम आवर्जून पाळले जात होते त्यामुळे स्पर्धा विना कटकटीच्या पार पाडल्या जात होत्या..हल्ली तसे होताना दिसून येत नाही.. त्यातच शर्यतीमुळे ग्रामीण अर्थकारणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे, मोठे अर्थार्जन होत असल्यामुळे शर्यती वर अवलंबून असणारे ग्रामीण कारागीर, बैल खरेदी, विक्री, वाहतूक, मंडप व्यवस्था, व्हिडिओ व फोटोग्राफी, लाईव्ह प्रक्षेपण, वैद्यकीय सुविधा, खुराक सामग्री, खाद्य व पिण्याचे पाणी चहा नाष्टा इत्यादी व्यवसायांना चालना मिळाली आहे..तसेच यामध्ये स्पर्धेच्या ठिकाणी जागा मिळण्यासाठी व्यावसायिक स्पर्धा ही वाढली आहे. याबाबत ही योग्य नियोजन न केल्यास भविष्यात वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही…

बैलगाडा शर्यतीची अंतिम सुनावणी माननीय सर्वोच्य न्यायालयात नोव्हेंबर 22 मध्ये पूर्ण झालेली असून अंतिम निकाल अद्याप बाकी आहे.. म्हणूनच बैलगाडा शर्यती या पुढे अविरतपणे चालू ठेवण्यासाठी बैलगाडा मालक, आयोजक, प्रेक्षक व शर्यतीसंबंधित असणारे व्यावसायिक यांनी समज गैरसमज टाळून किरकोळ वाद विवाद बाबत दक्ष असणे आवश्यक आहे व तेच सर्वांचे हिताचे ठरणार आहे….!

Leave a Comment