खरंच ड्रीम इलेव्हन मधून रोज एक जण
एक कोटी जिंकतो का?
खरंच ड्रीम इलेव्हन ला एवढे पैसे द्यायला परवडते का यातून रोज एक माणूस करोडपती होतो का?माहिती पूर्ण बघा तुमच्या कामाची निदान तुमच्यावर पण ते ड्रीम इलेव्हनचा पांचट गरिबी वाले जोक्स फॉरवर्ड करण्याची वेळ येणार नाही . नमस्कार तसं तर ड्रीम इलेव्हन लॉंच होणे आधीपासूनच भारतीय खेळांमध्ये सट्टा लावण्याचा बेकायदेशीर प्रकार अस्तित्वात होता म्हणजे अजूनही काही प्रमाणात तो अस्तित्वात आहे त्यातल्या त्यात क्रिकेटमध्ये जरा जास्त म्हणजे कोणती टीम जिंकणार कुठला प्लेयर चांगला खेळणार त्यावर पैसे लावायचे आणि जर तुका बरोबर लागला तर त्या सट्टातून बक्कळ पैसे कमवायचे तुम्हाला त्याबद्दल आणखी जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही इमरान हाश्मीचा जन्नत पिक्चर बघा त्यात सट्टा सगळा मार्केट समजेल या सगळ्या गोष्टींवर मुंबईतल्या व्यापारी कुटुंबातील दोन माणसांचं बारीक लक्ष होते हर्ष जैन आणि भावीत जैन अशी त्यांची नावे त्यांनी भारतातलं मार्केट ओळखलं होतं आणि तेव्हापासूनच ते मार्केट काबीज करण्याचाही त्यांनी प्लॅन टाकला होता 2007 ला दोघेही अमेरिकेतून एमबीए शिकून घेऊन आले आणि 2008 पासून त्यांनी पहिल्यांदा ड्रीमिलियनच्या कन्सेप्टर काम करायला सुरुवात केली. खरंतर तो एक प्रकारचा सत्याचा गेम होता पण तो कायदेशीर आणि ऑनलाईन कसा करता येईल यावर त्यांचं काम सुरू होतं पुढे 2012 ला त्यांनी ड्रीम इलेव्हन ऑफिशियली मार्केटमध्ये लॉन्च केलं .
लोकांमध्ये ड्रीम इलेव्हन ची क्रेझ कशी निर्माण झाली !
त्यामध्ये त्यांनी सिंगल प्लेअर फॅन्टसी गेमिंग ची सुविधा उपलब्ध करून दिली ते पण कायदेशीर रित्या एका वेळेस 70 ते 80 लाख लोकांनी मेघालिग मध्ये 49 रुपये लावायचे म्हणजे 49 रुपयात तुमचं स्किल वापरून टीम बनवायची आणि मॅच होईल तोवर निवांत झोपून राहायचं रात्र उजाळून सकाळ होईल तोवर रोज एक माणूस करोडपती .आयडिया खतरनाक होती एका वर्षात ड्रीम इलेव्हन हिट झाले लोकांना एक करोड जिंकण्याची स्वप्न पडू लागली लोक सकाळपर्यंत जिंकलेल्या पैशाने कोणता बिजनेस टाकायचा कोणती गाडी घ्यायची मुंबई टू बीएचके घ्यायचा की गावाला 30 लाखांचा बंगला बांधायचा उरलेला पैसा कुणाच्या नावावर टाकायचा असे विचारात झोपू लागली रकमेवर 31 टक्के टॅक्स लागणार होता म्हणजे कोणी एक करोड जिंकले तर त्या युजरला त्यातले 31 लाख रुपये सरकारला द्यावे लागणार आणि राहिलेले 69 लाख त्याला स्वतःला भेटला म्हणजे सरकारचा पण फायदा ऍक्च्युली गेम मध्ये दम होता लोकांना याचं व्यसन लागलं होतं रोज 49 गुंतवल्याशिवाय लोकांना चेनच पडत नव्हता. पण पैसे वाल्यांसाठी त्यात हेड टू हेट नावाची जबराट स्कीम त्यात मोठे लोक अगदी पंधरा रुपयांपासून लाखो रुपये लावून टीम बनवू शकत होते पण तरीही त्याची सगळ्यात जास्त शिकार कोण झालं होतं तर हाताला काम नसलेली गावोगाव ची बेरोजगार पोर एक कोटीच्या धुंदीत त्यांना आपलं हक्काचे करियर च भान राहिलेलं नव्हतं.
ड्रीम इलेव्हन वरती झाली कोर्टामध्ये याचिका दाखल !
2014 पासून कंपनीचा सुवर्णकाळ सुरू झाला तेव्हापासून कंपनीच्या व्हॅल्युएशन मध्ये मध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली पण कमी काळात कोणी प्रगती करताना दिसलं की गोष्टी लोकांच्या डोळ्यावर आल्याशिवाय राहत नाही जेव्हा ड्रीम इलेव्हनचा अतिरेक झाला आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली असे लोकांना समजू लागलं तेव्हा ड्रीम इलेव्हनला विरोध होऊ लागला ड्रीम इलेव्हन हे देशात सट्टाला प्रमोट करते आणि त्यामुळे तरुणांचं नुकसान होतंय अशी याचिका 2017 ला कोर्टात दाखल करण्यात आली होती तेव्हा ते ड्रीम इलेव्हन प्रकरण निब्बर चर्चेत आले होतो आणि त्याचं नाव पण खराब झालं होतं पण जेव्हा कोर्टात युक्तिवाद झाला तेव्हा ड्रीम इलेव्हननी त्यांची बाजू मांडली आणि सांगितलं की आमचा खेळ हा गेम ऑफ लक नसून गेम ऑफ स्किल आहे म्हणजे आमच्या खेळात लोकांना पैसा नशिबाने नाही तर त्यांच्याजवळ असणाऱ्या नॉलेजमुळे स्किलमुळे मिळतो लोक एकूण 22 खेळाडूंना त्यांचा मागचा परफॉर्मन्स सध्याचा फॉर्म याचा रिपोर्ट अशा गोष्टींचं नॉलेज ठेवून बेस्ट इलेव्हन खेळाडू निवडतात आणि गेम मध्ये पैसे गुंतवतात खरंतर ती एक प्रकारची कायदेशीर रित्या काढलेली पळवट होती पण कोर्टाने त्यांची बाजू ऐकून घेतली आणि शेवटी निर्णय सुद्धा त्यांच्याच बाजूला दिला. कोर्टाच्या निर्णयाने ड्रीम इलेव्हन हे गेम ऑफ लक नसून गेम ऑफ स्किल आहे त्यावर शिक्का पडला पण या सगळ्या ड्रीम इलेव्हन च नाव खूप खराब झालं होतं.
लोक पैसे लावतात आणि त्यावरून ड्रीम इलेव्हन किती पैसे कमावतात !
आता गेलेली इज्जत परत मिळवायची असेल तर आपल्या गेमला फेमस आणि ऑथराई चेहरा दिला पाहिजे असा ड्रीम 11 च्या मालकांनी विचार केला पुढे मग खेलो मगर दिमागसे असं म्हणत महेंद्रसिंग धोनी आपल्यासमोर ड्रीम इलेव्हनची जाहिरात करताना दिसू लागला आता ड्रीम इलेव्हन ला गेलेला ट्रस्ट परत मिळाला धोनी नंतर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, यजुवेंद्र चहल या सगळ्यांनी ड्रीम इलेव्हनचा मार्केटिंग केलं तिथून पुढे कंपनीने जी उचल खाल्ली ती बोलायला नको 2018 ला कंपनीचा व्हॅल्युएशन वन बिलियन डॉलरच्या वर गेलो होतो आणि ड्रीम इलेव्हन युनिकॉर्नच्या यादीत जाऊन बसणारी पहिली भारतीय गेमिंग कंपनी बनली होती तर 2019 आली ड्रीम इलेव्हन ला 775 करोडचा नफा झाला होता तसेच 2020 मध्ये 2217 करोड 2021 मध्ये 2554 करोड आणि 2022 मध्ये 3840 करोड इतका नफा कंपनीने कमावला या दरम्यान कंपनीने जाहिरातीसाठी तेराशे कोटींपेक्षा जास्त खर्च केलाय 2020 आणि 21 मध्ये तर ड्रीम इलेव्हन आयपीएल टायटल स्पॉन्सर केलं होतं 2025 पर्यंत 50 मिलियनचा टर्नओव्हर करण्याचा कंपनीचा अजेंडा आहे सध्या ड्रीम इलेव्हनचा यश बघून एम पी एल, पेटीएम फर्स्ट ,गेम फेरप्ले, हाउसॅट, माय सर्कल इलेव्हन. माय रियल इलेव्हन ,अशा भरपूर फॅन्टासी गेम्स बाजारात आल्या त्याच्या प्रमोशन साठी सचिन, लक्ष्मण, गांगुली, युवराज ,इरफान पठाण यासारखे दिग्गज लोकांनी कंबर कसलेले सध्या तर आमिर खान सारखा अभिनेता सुद्धा ड्रीम इलेव्हनच्या जाहिरातीत दिसू लागला पण एवढं सगळं असूनही ड्रीम इलेव्हन किंवा तशा तत्सम्सची गेम्स घेऊन अद्याप किती लोक करोडपती झाले त्याची खरी आकडेवारी माध्यमांसमोर आलेली नाही आजवर फक्त बिहारच्या सौरभ कुमारने 49 रुपये लावून एक कोटी रुपये जिंकलेची बातमी पेपर आणि टीव्ही मध्ये आली होती बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार जर रोज एक माणूस करोडपती होतोय तर त्याची बातमी पेपर किंवा टीव्हीला का दाखवली जात नाही किमान पेपर वाल्यांनी तरी तशा विजेत्यांचा एक कॉलम चालवला पाहिजे आम्हाला वाटते ड्रीम इलेव्हन इज कम्प्युटर द्वारे तयार केलेल्या टीम्स जिंकत असावे त्याबद्दल ड्रीम इलेव्हनच्या पदाधिकाऱ्यांची माध्यमांनी आणि न्यूज चैनल वाल्यांनी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही आता आमच्या ॲपवर चॅटिंगची सुविधा निर्माण केली जो माणूस आमची ग्रँड लीग जिंकतो त्याच्याशी युजर्स थेट मेसेज वर बोलू शकतात किंवा शक्य असेल तर भेटू शकता आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही जसं टीम लावताना लॉजिक लावता तसं वैयक्तिक लॉजिक लावून ठरू शकतात कारण ड्रीम इलेव्हन खेळायचं का नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय फक्त खेळताना मध्ये सांगितलं जातं तसं इस खेल मे आर्थिक जोखीम हो सकती है या फिर इसकी आदत लग सकती है कृपया जिम्मेदारी से खेले ही की सूचना वजा धमकी लक्षात ठेवा निदान एक करोडच्या नादात घराचा पत्रा विकून बसाल बाकी तुमच्या आसपास कोण ड्रीम इलेव्हन वरून करोडपती झाल्याचे उदाहरण असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा .