मध्ये गेले महिनाभर सुरू असलेल्या राज्यातल्या लोकसभा निवडणुकांचा धडाका आता संपला आहे. त्यामुळे आता नेत्यांच्या सोबतच राज्यातल्या सगळ्या जनतेला चार जून ची चाहूल लागळी आहे .4 जून ला देशातल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यातही बदललेल्या राजकीय समीकरणामुळे सध्या काही राजकीय गटाच्या उमेदवारांच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यातीलच एक महत्वाचा गट म्हणजे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल अजित पवार गट. पण महायुतीमध्ये अजितदादांच्या वाट्याला फक्त चारच जागा मिळाल्या असल्या तरी त्यांच्या चार जागंच्या निकालावर अजितदादा गटाचे पुढचं भवितव्य अवलंबून असणार हे मात्र नक्की आहे. म्हणूनच अजित दादा गटाने लढवलेल्या चार जागांवर कसे निकाल लागत आहेत. अजित दादा गटाने लढवलेल्या चार जागांवर कोण हरतंय, कोण जिंकणार हे आपण आज जाणून घेणार आहोत.
नमस्कार, तर मग अजित पवार गटाने लढवलेली आणि बहुचर्चित अशी पहिली सगळ्यात महत्त्वाची जागा आहे ती म्हणजे बारामती मध्ये बारामती मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे हे उमेदवार असणार हे जवळपास शंभर टक्के होता. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणताही उमेदवार द्यायचा यावरून अजित पवार गटामध्ये खल सुरू होता. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करून महायुती मास्टरस्ट्रोक मारला असं सगळ्यांना वाटलं. पण निवडणूकीदरम्यान मात्र तसे काही दिसत नाही. कारण मतदार संघात पहिल्या पासूनच सुप्रिया सुळे यांच्या बाजूने वार पाहायला मिळाल्या. शरद पवारांन बद्दल ची सहानुभूती सुप्रिया सुळे यांचा वैयक्तिक संसदे मधील काम त्याच्या बळावर सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीच्या काळातच मतदार संघात आघाडी घेतली होती. पण नंतरच्या काळात अजित पवार यांनी देखील ताकद लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तगडी प्रचार यंत्रणा याच्या जोरावर अखेरच्या टप्प्यात अजित पवारांनी इथे उसंडी घेण्याचा प्रयत्न केला खरा पण तो तितकासा प्रभावी ठरला असं म्हणता येणार नाही. महायुती मधील नेत्यांची अंतर्गत नाराजी शरद पवार यांचा बेरजेचे राजकारण सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडले, असेही म्हणता येईल. बाकी शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर झाला असं ऐकिवात येत आहे. त्यामुळे ऐनवेळी कुठली गणितं फिरतील काय हे निकालाच्या दिवशी पाहावे लागेल. सध्या तरी इथलं पारडे सुप्रिया सुळे यांच्या बाजूने दिसत आहे.
त्यानंतर अजित पवार गटाने लढवल्या असा दुसरा क्रमांकाचा मतदारसंघ. तो म्हणजे शिरूर तर बघा शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने शिंदे गटातून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढवली आहे. पण त्या मतदारसंघामध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे यांचा सामना होणार असला तरी खरी लढत अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये झाली असं म्हणता येईल. आता सद्यस्थितीत शिरुर मधील कागदावरचे समीकरण ही शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाजूने दिसत असली तरी येथील राजकीय वातावरण मात्र काहीशा प्रमाणात अमोल कोल्हे यांच्या बाजूने झुकतंय असं बोलल जातय . आता खरतर त्याची कारणेही तशीच आहेत. तर मग त्यातलं मुख्य कारण म्हणजे कागदावर काही नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाजूने दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी आढळरावं यांचा प्रचार केलेला दिसत नाही. त्यामुळे याचा परिणाम नक्कीच मतदाना मध्ये दिसून येईल, असे बोलले जाते. त्याच बरोबर मागच्या पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी संसदेत आपल्या प्रभावी भाषणांच्या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे इथले मतदार हे अमोल कोल्हे यांच्या बाजूने उभे असल्याचे दिसून येत आहे. या शिवाय महायुती मधील नेत्यांची संशयास्पद भूमिका आणि शरद पवारांच्या पाच सभा अमोल कोल्हे यांच्या पथ्यावर पडणार असं दिसतंय. एकूणच पाहायला गेलं तरी तिथलं वातावरण हे अमोल कोल्हे यांना पूरक दिसत आहे.
त्यानंतर असे अजित पवार गटाने उमेदवार उभा केलाय अशी तिची जागा आहे. ती म्हणजे धाराशिव यात अजित पवार गटाकडून तुळजापुर लोकसभा मतदारसंघाचे आमदार रहाणारणजित सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर ठाकरे गटाकडून ओम राजे निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मंडळी ओम राजे निंबाळकर यांचा दांडगा जनसंपर्क आणि लोकांशी फोनवरून साधलेला संवाद यामुळे सामान्य मतदार. ओम राजे यांच्या बाजूने झुकल्याचे प्रामुख्याने दिसून आल आहे. अर्चना पाटील यांच्यासाठी महायुतीच बूथलेव्हल च काम आणि त्यांची महिला वर्गात असलेली प्रतिमा आणि नरेंद्र मोदी यांनी पुढे केलेल्या विकासाच्या मुद्यांच्या आधारे अर्चना पाटील यांचे पारडे जड असताना ओम राजेंनिंबाळकर यांनी फोनद्वारे साधलेला संपर्क आणि सर्वसामान्य जनतेशी असलेली जवळीकता पाहता ओम राजे विजयाची पुनरावृत्ती करणार अशी धाराशिव मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातही महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजेंनिंबाळकर यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव मध्ये सभा घेतली. तर शरद पवार यांनी तुळजापूर मध्ये सहभाग घेऊन ओमराजे निंबाळकर यांना निवडून देण्याच मतदारांना आवाहन केलं आहे. त्यामुळे एकूणच इथून ओमराजे निंबाळकर त्यांचा जनसंपर्क त्यांच्या पथ्यावर पडणार असं दिसतंय.
त्यानंतर पुढचा चौथा मतदार संघ तो म्हणजे रायगड मंडळी रायगड लोकसभा मतदार संघात अजित पवार गटाकडून सुनील तटकरे मैदानात होते. तर उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. खरे तर अनंत गीते यांनी निवडणूक प्रचारात सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती, हे त्यांच्या सभामधील गर्दीवरून स्पष्ट होतं. आता खरे तर शिवसेनेच्या जन्मापासून बालेकिल्ला राहिलेल्या कोकणातील जनतेमध्ये धनुष्यबाण चिन्ह शिंदेना दिल्याचा राग जनतेच्या मनात असल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्यासाठी सहानुभूतीची मोठी लाट तयार झाली होती. याचा मोठा फायदा आनंत गिते त्यांना होईल, अशी राजकीय विश्लेषका नमध्ये चर्चा आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोराबा घेतलेली सभा झाल्यानंतर त्यांना पोषक ठरेल. त्यात उद्धव यांच्याबरोबर आता शेतकरी कामगार पक्ष आणि मुस्लिम मतदार या वेळच्या निवडणुकीमध्ये निर्णायक टप्पा ठरणार आहे. मुस्लिम मतही ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळतील असं बोललं जातंय. एकूणच बघायला गेलं तर मतदानानंतर रायगड मतदारसंघात अनंत गीते यांचा विजय होईल अशी शक्यता आहे. एकूणच बघायला गेलं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सहानुभूती सहानभूती मुळे अजित पवार गटाला त्यांच्या जागा निवडून आणण्यासाठी कष्ट करावे लागले आहेत हे नक्की म्हणून राजकीय जाणकार आणि स्थानिक जनतेच्या म्हणण्यानुसार या चार जागांपैकी अजित पवार गटाची एक सुद्धा जागा निवडून येणं कठीण आहे पण आता असेल तर अजित पवार गटाचा राजकीय भवितव्य काय असेल हे पाहावे लागेल. अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीत भाजपला सोबत घेईल का हा देखील मोठा असाही प्रश्न आहे. पण तुम्हाला नेमक काय वाटतय. अजित पवार गट लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकू शकतो? निवडणूक निकालानंतर अजित पवार गटाचे भवितव्य नेमका काय असेल? तुमचं मत मला कंमेंट करून नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.