नववी नापास रिंकू सिंग आयपीएलचा सुपरस्टार कसा झाला
रिंकू सिंग कालपर्यंत लय जणांना हे नाव पण माहीत नसेल पण आज मात्र भावाचं नाव प्रत्येक क्रिकेट फॅन च्या काळजात बसला आहे कारण या बहादरांना कारनामा तसा केला आहे. म्हणजेच राजस्थान कडून खेळताना राहुल तेवतीयने पंजाब विरुद्धच्या एका मॅच मध्ये पंजाब टीमच्या पुंग्या
टाईट केल्या होत्या पण तसंच काहीतरी या भावाने केले म्हणजेच यश दयाल या बॉलरच्या बॉलिंगवर रिंकू सिंग याने सहा बॉल मध्य पाच षटकार ठोकून गुजरात संघाच्या हाता तोंडाला आलेला पण रिंकू सिंग याने खेचून घेतला हा रिंकू सिंग आहे तरी कोण एक नवीन नापास गरीब घरचा पोरगा कसा बनला आयपीएलचा सुपरस्टार हेच आपण या ब्लॉकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.
रिंकू सिंग ची आयपीएल मध्ये दमदार एन्ट्री
तर बघा काल केकेआर विरुद्ध गुजरात टायटन्स अशी लढत झाली तशा दोन्ही टीम जोरदार आहेत त्यामुळे नेमका कोण जिंकणार हे समजायला मार्ग नव्हता म्हणजेच गुजरातने पहिल्यांदा बॅटिंग करून विजय शंकर आणि साई सुदर्शन यांच्या तडाकेबाज परफॉर्मन्स मध्ये 204 रणांचा डोंगर उभा केला केकेआर पुढे लक्ष होतं 205 जणांचं व्यंकटेश अय्यर आणि कॅप्टन नितेश राणा यांनी धडाकेबाज बॅटिंग केली. व्यंकटेश अय्यरणे 40 बोलात 83 धावा काढल्या. पण शेवट वाहतात झाली आणि केकेआर आता हरणार अशी परिस्थिती निर्माण झाली. केकेआर चा डाव चांगला चाललेला असताना आधी आंध्र रसल सुनील नारायण आणि त्या पाठोपाठ शार्दुल ठाकूर अशा एकापाठोपाठ तीन तीन विकेट घेऊन गुजरात टायटनच्या कॅप्टन रशीद खानने हॅट्रिक केली शेवट केकेआर ला 6 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता होती. उमेश यादवने एक रण काढून स्ट्राइक रिंकू सिंगला दिली. दुसऱ्या बॉल मध्ये रिंकू सिंग ने ऑफ साईडला धमाकेदार छक्का टाकला.तिसरा बॉल रिंकूच्च्या पायावर लो फुल टॉसआला यामध्ये जबरदस्त SIX टाकला. चौथा बोल पुन्हा फुल टॉस रिंकू ने त्याचा पुरेपूर फायदा घेतला.आता मात्र गुजरात टायटन्स टेन्शनमध्ये आलं. त्यानंतर कॅप्टन राशीद खान जयंत यादव आणि शुभम गिल यांची टीम मीटिंग झाली दयाळ ला सगळ्यांनी कॉन्फिडन्स दिला पण खेळ पुढच्या बॉल ला बिघडला. पुढचा बॉल टाकला ऑफ साईट ला बॅट फिरवली आणि तोही फिक्स गेला थेट लॉंग ऑन च्या दिशेने आता केकेआरला जिंकण्यासाठी एका बोल मध्ये सहा धावांची आवश्यकता होती तिकडे रिंकू पेटला होता काहीही घडू शकणार होतं हार किंवा जित अखेर फायनल बॉल वरही रिंकू ने सहा रन घेतले . रिंकू ने हवा केली पाच बॉल पाच सिक्स टाकून त्याने केकेआर च्या संघाला विजय मिळवून दिला.
आता आपण जाणून घेऊया रिंकू चा इथं पर्यंतचा प्रवास .
रिंकू अतिशय गरीब कुटुंबातील मुलगा आहे रिंकू मूळचा यूपीच्या अली गडचा अलिगड स्टेडियम जवळच घर आहे . त्याला एकूण चार भावंड आहेत त्यामधील हा तिसरा एकूण दोन बहिणी आणि दोन भाऊ एक ट्युशन मध्ये शिकवायच काम करायचा तर दुसरा रिक्षा ड्रायव्हर रिंकू ची घरची परिस्थिती अतिशय बेताची होती त्यात शिक्षणातही जेमतेमच नववीत तो चक्क नापास झाला होता वडील सायकलवरून सिलेंडर घेऊन गॅस वाटायचे त्यातून जे पैसे मिळायचे त्यावर त्यांचं घर चालायचं घर पण दोन खोली एवढेच होतं वडील आणि भाव मिळून महिन्याला फक्त सहा सात हजार कमवायचे त्यात घरावर पाच लाखांचा कर्ज होतं
. म्हणूनच आपण क्रिकेट खेळायचं आणि त्या पैशातून आपण हे सर्व कर्ज फेडायचं असं रिंकूच्या डोक्यात फिक्स झालं होतं. 2018 स*** त्याला केकेआर कडून खेळण्यासाठी निवडलं होतं तेही ८० लाखांना.
रिंकू म्हणतो मी पहिल्यांदाच इतके पैसे एक साथ बघितले मीच नाही माझ्या खानदानात कधी एवढी रक्कम एकत्र कोणी बघितलीच नाही मला वाटतं मला वीस लाख रुपये मिळतील पण मला तर खूपच जास्त पैसे मिळाले मला खूप आनंद झाला.
आनंद यासाठी की रिंकू ला त्याच्या भावाच्या लग्नात काही पैसे खर्च करता येणार होते. किंवा बहिणीच्या लग्नासाठी पैसे शिल्लक ठेवता येणार होते तेव्हा बहिण भावासाठी पैसा खर्च केला आहे सोबत एक घर घेतलं आज जरी रिंकू ची परिस्थिती चांगली असली तरी काही काळापूर्वी रिंकू मात्र पडेल ती काम करायचा . आयपीएल खेळण्यापूर्वी रिंकू चा भाऊ रिंकू ला एका ठिकाणी कामासाठी घेऊन गेला होता तिथल्या मालकाने रिंकू ला फरशी पुसायचं काम सांगितलं रिंकू ने ते काम केले ही. पण तेव्हा तो घरी येऊन आईला म्हणाला मी परत कधी हे काम करणार नाही आणि घरातल्या कोणालाच असं काम करायला लागू देणार नाही मग रिंग पुढे क्रिकेट वरती फोकस केलं ते
आजपर्यंत !
घरच्यांना सुरुवातीला रिंकूच्या क्रिकेटवर इतका विश्वास नव्हता पण जेव्हा दिल्ली येथे झालेल्या एका सामन्यात यूपी कडून खेळताना त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली तेव्हा घरच्यांना कळलं की आपला मुलगाही काहीतरी करू शकतो तेव्हा रिंकू यूपी अंडर नाईन्टीन संघातून खेळत होता यावेळी रिंकू ला एका सामन्यात दिल्लीमध्ये एक टू व्हीलर बक्षीस मिळाली होती रिंकूचे वडील आता सायकल ऐवजी टू व्हीलर वरून गॅस सिलेंडर विकू लागले तिथून पुढे रिंकू एकदम मन लावून खेळू लागला. नंतर 2018 मध्ये रिंकूची केकेआर संघाकडून निवड झाली. केकेआर ने तेव्हा रिंकू ला 80 लाखांची बोली लावून संघामध्ये घेतलं होतं पण त्याचा फॉर्म काही सुरुवातीचा काळात काही खास नव्हता तरीही केकेआर ने त्याला कोर्ट मध्ये सतत रिटर्न केलं गेल्यावर्षी त्यांनी एकदा दाखवून दिलं की तो एक चांगला फिनिशर आहे यंदाही त्याची जोरदारफॉर्म चालला होत पण काल तर त्याने गुजरात संघाला उभ्या उभ्या चांदण्या दाखवत जोरदार डरकाळी फोडली केकेआर टीम मॅनेजमेंट ने ठेवलेला त्यावर विश्वास जिंकूने सार्थ करून दाखवला. आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं म्हणूनच आज रिंकू हे नाव क्रिकेट प्रेमींना माहिती नाही असा एकही आयपीएल लवर तुम्हाला मिळणार नाही रिंकू आज प्रत्येक क्रिकेटच्याप्रेमीच्या काळजात घुसलेला आहे म्हणूनच त्याचा प्रवास बघून फक्त एवढेच म्हणून वाटतं भावाने नाद केला पण वाया नाही गेला.
तुम्हाला हा रिंकू चा जीवनप्रवास ऐकून कसे वाटले कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद