Skip to content
या पाच कारणांमुळे शिंदे गट अयोध्येला चाललाय !!
आज एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष आयोध्याला रवाना झाला त्यांच्यासोबत भाजपचेही काही मंत्री अयोध्या दौऱ्याला चाललेत पण आता यानिमित्ताने सोबत भाजपचे मंत्री अयोध्येला का चाललेत आणि शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे आता आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहोत नमस्कार या आयोध्या दौऱ्यामुळे शिंदे गटाला होणारा
1)नंबर एकचा फायदा म्हणजे हिंदुत्ववादावर हक्क प्रस्थापित करणे
तर बघा ठाकरेंनी बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडलं आणि ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले त्या मुद्द्यावर शिंदेने त्यांची वेगळी चूल मांडले असे म्हटले गेले आता त्यांनी भाजपला साथ दिली हे खरं असलं तरी भाजप हे वेळो वेळी शिंदे गटाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करताना दिसतात कारण मुख्यमंत्री असले तरी प्रॅक्टिकल लेव्हलवर भाजप सरकार हे अधिक आहे सध्याच्या घडीला हिंदुत्व भोवतीव अधिक वेगाने बिल्ड होताना दिसताय आता त्यामुळे हिंदुत्वावर सर्वाधिक अधिकार कोणाचा यासाठी एकनाथ शिंदेंनी हे लीड घेण्याचा निर्णय घेतला असणार आणि म्हणूनच त्यांनी अयोध्येची निवड केली असणार कारण त्यापेक्षा मोठी हिंदूंसाठी पवित्र जागा सध्याच्या कोणतीच नाहीये ज्यावेळी बाबरी मशीद पडली तेव्हा बाळासाहेबांनी एका इंटरव्ह्यूमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या इशारा वरच शिवसैनिकांनी बाबरी पाडली होती बाळासाहेबांच्या विचारांना आपणच पुढे नेत आहे असे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे आता त्यांना याचा नक्की काय फायदा होऊ शकतो हे आपण पुढच्या मुद्द्यात समजून घेऊया .
2)नंबर दोन आहे शिवसेना आमची आहे
आता शिवसेना कोणाची हा प्रश्न गेल्या बऱ्याच काळापासून पेंडिंग होता आता सध्या तरी हा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित असला तरी निवडणूक आयोगाने शिवसेना शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे असं घोषित केला आहे तसेच चिन्ह व निशान हे शिंदे गटाला दिलेले आहे असलं तरी गद्दार पन्नास खोके एकदम ओके हे डाग पुसून काढायला शिंदे गट कमी पडला निवडणूक आयोगाची लढाई जिंकले तरीही शिंदे माणसातील शिंदे सरकार बद्दल परसेप्शन तयार करायला सातत्याने अपयशी ठरला कार्यक्रमाची गरज होती तेव्हा हेच ओळखून शिंदेंच्या शिवसेनेने हा दौरा नियोजन केला असावा आता राम मंदिरामुळे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले असे सांगून त्यांचे हेच हिंदुत्वचे विचार आपण पुढे नेतोय त्यामुळे खरी शिवसेना आमचीच असल्याचे प्रत्यक्ष जनमानसात नेण्याचा मोठा प्रयत्न आहे शिंदे गट या निमित्ताने करताना दिसेल .
3)भाजपा ठाकरे गटाला काउंटर चेक
ठाकरे गट असो की आजचा शिंदे गट भाजपा नेहमीच राष्ट्रवादीला काउंटर चेक करत आलेला आहे वेळोवेळी ठाकरे गट किंवा शिंदेगटाची बार्गेनिंग डाऊन करत आला आहे आता मात्र ही संधी शिंदे गटाला आहे कारण या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या दृष्टीने भाजपा ठाकरे यांनी उचललेल्या एक पावलाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न शिंदे या दौरा निमित्त केली आहे हिंदुत्वाच्या दृष्टीने हा ठाकरे गटाला व भाजीपाला एक मोठा काउंटर चेक आहे तसेच कुणास ठाऊक उद्या उठून एकनाथ शिंदे शरद पवार यांचे कौतुक करताना दिसेल कारण भाजपासाठीचा तो एक काउंटर चेक एकनाथ शिंदे कडे असेल यापूर्वी एमसीए निवडणुकीत या शरद पवार यांचं कौतुक करताना एकनाथ शिंदे दिसले होते.
4) नंबर चार आहे भाजपा शिंदे युतीतील बार्गेनिक वाढवणे
मागे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला फक्त 40 50 जागा देण्याचा एक वक्तव्य मोठे गाजलं होतं पण त्यावर शिंदे घाटाच्या नेते संजय गायकवाड वगैरे मंडळींनी बावनकुळे यांना तीव्र शब्दात सुनावल होतं बावनकुळेंनी यावर नंतर बरीच सारवा सारव केली. पण आमचा जागा वाटपातला हक्क मोठा आहे तो फिफ्टी-फिफ्टी ही होऊ शकतो असं दाखवून देण्याची संधी शिंदे यांना या निमित्ताने मिळणार आहे.
5) फडवणीसांच्या नेतृत्वाला आव्हान
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असूनही बऱ्याच वेळा देवेंद्र फडवणीस राज्य चालवत आहे अशी टीका विरोधक करतात म्हणजे जिथे जाईल तिथे फडणवीस एकनाथ शिंदे सोबत जातात कुठल्याही उद्घाटनाला सोबत कुठल्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात ही सोबत असतात इव्हन एकनाथ शिंदे यांनी काय बोलायचं हे देखील फडणवीसच हळू सांगतात असा आरोप त्यांच्यावर विरोधकांनी ठेवला आहे एवढेच नाही तर दिल्लीतील एका ऑफिशियल परदेशीलाही शिंदे ऐवजी मुख्यमंत्री असूनही फडणवीस यांनी हजेरी लावली होती असे समजत आहे आता या सगळ्यामुळे फडवणीस सावली म्हणून काम करणे एकनाथ शिंदेंना या काळात परवडणार नाही आपलं वेगळं अस्तित्व हवा याच धारणेतून एकनाथ शिंदे यांचा हा दौरा मुळात महत्त्वाचा पूर्ण असणार आहे आता एकनाथ शिंदे गटासोबत गिरीश महाजन संजय कुटे आणि काही इतर भाजपचे आमदार आहे त्याला चाललेत पण ते भाजपाचे वरिष्ठांच्या असणारे मोहित कंबोज ही एकनाथ शिंदे बरोबर अयोध्या दौऱ्यात चाललेत यात कंबोज यांचा शिंदे यांच्या बंडात मोठा वाटा होता असं म्हणतात एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाऊन काही वेगळा हालचाली करू नयेत म्हणूनच भाजपची ही मंडळी शिंदे घटना सोबत चालली आहे असे शंका विरोधी गटाकडून व्यक्त केली जात आहे बाकी एकनाथ शिंदे गटाला अजून काय फायदे होऊ शकतात का आणि जर झाले तर कोणते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा